You are currently viewing जिल्ह्यात 2 लाख 79 हजार 435 जणांनी घेतला पहिला डोस…

जिल्ह्यात 2 लाख 79 हजार 435 जणांनी घेतला पहिला डोस…


सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 79 हजार 435 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.


यामध्ये एकूण 9 हजार 815 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 340 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 903 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 5 हजार 845 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 92 हजार 45 व्यक्तींनी पहिला डोस तर 36 हजार 185 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 93 हजार 314 नागरिकांनी पहिला डोस तर 24 हजार 164 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 74 हजार 358 जणांनी पहिला डोस तर 9 हजार 144 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 3 लाख 62 हजार 113 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.


जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 3 लाख 44 हजार 700 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 51 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 93 हजार 220 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 2 लाख 67 हजार 396 कोविशिल्ड आणि 94 हजार 717 कोवॅक्सिन असे मिळून 3 लाख 62 हजार 113 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 4 हजार 750 लसी उपलब्ध असून त्यापैकी 4 हजार 650 कोविशिल्डच्या आणि 100 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 730 लसी शिल्लक असून त्यापैकी 260 कोविशिल्ड आणि 470 हजार कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत.

अभिप्राय द्या..