You are currently viewing ठाकरे सरकारचा मोठा निर्णय पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची तातडीची मदत जाहीर..

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची तातडीची मदत जाहीर..


मुंबई /-

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. त्यानंतर मंत्रिमंडळात यास मान्यता देण्यात आली आहे.

घर पडलेलं असल्यास दीड लाख:-

पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यता आला आहे. दुकानदारांना 50 हजार आणि टपरीसाठी 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्ण घर पडलं असेल तर 1 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

महत्त्वाचे निर्णय:-

पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 10 हजार रुपये देणार
🔅पूर्ण घर पडलं असेल तर दीड लाखाची मदत
🔅अर्ध घर पडलं असेल तर 50 हजाराची मदत
🔅दुकानदारांना 50 हजाराची मदत देणार
🔅टपरीधारकांना 10 हजार रुपये देणार
🔅उद्यापासूनच मदत देण्यास सुरुवात होणार

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नांदेड, परभणीसह संपूर्ण राज्यातील पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींचं पॅकेज जाहीर

🔅एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत
🔅4 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान
🔅4 हजार 500 जनावरांच्या मृत्यूची नुकसान भरपाई देणार
🔅जनावरांच्या मृत्यूंची 7 कोटींची भरपाई देणार
🔅3 दिवसात पंचनामे पूर्ण होणार

अभिप्राय द्या..