You are currently viewing विद्यालय ॲप परीक्षेत मानसी दीपक पेडणेकर आणि यशश्री ताम्हणकर तालुक्यात प्रथम….

विद्यालय ॲप परीक्षेत मानसी दीपक पेडणेकर आणि यशश्री ताम्हणकर तालुक्यात प्रथम….

मसुरे /-

पंचायत समिती मालवण व शिक्षण विभाग मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने covid-19 च्या पार्श्वभूमीवर आयोजित विद्यालय परीक्षेमध्ये मसुरे केंद्र शाळेची विद्यार्थिनी कुमारी मानसी दीपक पेडणेकर आणि यशश्री गुरुनाथ ताम्हणकर इयत्ता चौथी यांनी मालवण तालुक्या मध्ये संयुक्त प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. 5 नोव्हेंबर 2020 रोजी सदर स्पर्धा मालवण येथे संपन्न झाली होती. मानसी आणि यशश्री हिला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र यावेळी देऊन गौरविण्यात आले. यापूर्वी मानसी आणि यशश्री हिने विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.. मानसी पेडणेकर हिचे मालवण पंचायत समितीचे सभापती श्री अजिंक्य पाताडे, उपसभापती सतीश परूळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, गटशिक्षणाधिकारी संजय माने, मसुरे केंद्र शाळा प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत, मसुरे केंद्रप्रमुख श्रीयुत देशमुख सर, प्रशालेचे शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, विनोद कदम, विनोद सातार्डेकर श्रीयुत गावडे सर,श्रीमती मगर मॅडम, शाळा समिती अध्यक्ष बापू मसुरेकर, माझी जी प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर,मर्डे सरपंच संदीप हडकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, जि प सदस्य सरोज परब, पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा