मळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

मळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

सावंतवाडी /-

भोसले फार्मसी कॉलेजचा एनएसएस विभाग, मेडिकेअर क्लिनिक व अमिता फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाजवळील नंदनगरी येथे मोफत आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रा. तुषार रुकारी, एनएसएस विभाग प्रमुख प्रा. ओवी पराडकर, डॉ. विक्रम आजगेकर, डॉ. दीपाली परब, अमिता परब, सौरभ सावंत आदी उपस्थित होते. कोरोना साथीच्या काळात अनेक रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोचू शकत नाहीत.

त्यातही मधुमेह, रक्तदाबसारख्या रुग्णांना त्यांची नियमित तपासणी करण्यात अडचणी निर्माण होतात. अशा वेळी त्यांना या तपासण्या करणे सोपे जावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रुग्णांचे वजन व उंची, रक्तातील साखर, रक्तदाब, पल्स रेट, बीएमआर, ईसीजी आदी तपासण्या करून मिळतील. डॉ. विक्रम आजगेकर व डॉ. दीपाली परब या सर्व सेवा मोफत देणार असून त्यांना अमिता फार्मसीच्या अमिता परब यांचे सहकार्य लाभलेले आहे.

हे शिबीर १२ आॅक्टोबरपर्यंत सुरु राहणार असून इच्छुक रुग्णांनी त्यांची जुनी प्रिस्क्रिप्शन्स व रिपोर्ट्स घेऊन मेडिकेअर क्लिनिक, नंदनगरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

अभिप्राय द्या..