मालवण /-

प्रभागातील नागरिक हे आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहेत आणि त्यांच्या आरोग्याची काळजीला प्राधान्य देणारे मालवण पालिकेचे बांधकाम सभापती यतीन खोत यांनी नेहमीप्रमाणे यावर्षीही हटके पद्धतीने वाढदिवस साजरा केला. मालवणात कोरोना रुग्ण अलीकडील काळात वाढू लागल्याने त्यांनी यावर्षीचा वाढदिवस वैद्यकीय उपक्रम राबवून साजरा केला. यात त्यांना प्रभागातील कार्यकर्त्यांसह त्यांच्या पत्नी शिल्पा खोत यांची मोलाची साथ लाभली.

नगरसेवक यतीन खोत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग तीनमध्ये स्वयंसेवकांच्या सहकार्याने घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची थर्मल गन आणि ऑक्सिमीटरने नोंदणी करण्यात आली. यावेळी शिल्पा खोत, दीपेश पवार, साक्षी मयेकर, नाबर मॅडम, दिया पवार, मानसी घाडीगावकर, अक्षय, गणेश चिंदरकर, अल्पेश वराडकर, दीपा पवार आदी उपस्थित होते. प्रभागात आरोग्य सर्वे करण्यापूर्वी सर्व स्वयंसेवकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या हाकेला दाद देत बांधकाम सभापती खोत यांनी संपूर्ण प्रभाग आपले कुटुंब मानून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी मोहीम राबवली. तसेच मालवण बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करून त्यांच्या प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेतल्या. खोत दाम्पत्य नेहमीच आगळावेगळे जनहितार्थ सामाजिक उपक्रम राबवित असतात.

मामा वरेरकर येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात आरोग्य सहाय्यक श्री. कोरडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपकरण हाताळणी, रजिस्टर नोंदणी कशा कराव्यात. स्वतःबरोबरच समोरच्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी खोत दाम्पत्यानी सदैव प्रशासनाला मदत करू, अशी ग्वाही दिली. खोत यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल यतीन व शिल्पा खोत यांचे आरोग्य विभागानेही आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page