डॉक्टरांच्या पर्यायी व्यवस्थेकडे आ.वैभव नाईक यांनी वेधले लक्ष

डॉक्टरांच्या पर्यायी व्यवस्थेकडे आ.वैभव नाईक यांनी वेधले लक्ष

कणकवली /-

ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा कोविड रुग्णालयास जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज भेट दिली. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकूरकर उपस्थित होते.यावेळी कोविड रूग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा तसेच उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला.

तसेच जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कोविड रुग्णालयाच्या स्वच्छतेबाबत, निर्जंतुकीकरणाबाबत, कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबाबत, जेवणाबाबत तसेच रूग्णांना दिल्या जाणाऱ्या इतर सोईंबाबत आढावा घेत आवश्यक सूचना जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकूरकर यांना दिल्या आहेत.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील अनेक शासकीय डॉक्टर व नर्स कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने कोविड रूग्णांवर उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता भासू नये यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

अभिप्राय द्या..