वैभववाडीत तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पार.;आज दोघांचा मृत्यू.

वैभववाडीत तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पार.;आज दोघांचा मृत्यू.

वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर दिघांचा किरोनाने मृत्यू झाला .तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत आज विक्रमी वाढ झाली असून तालुक्यात रुग्णांचा आकडा शंभरी पार झाला आहे. बुधवारी एकूण 16 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तालुक्यातील 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे. मृत झालेल्या रुग्णांमध्ये कोकिसरे व तिथवली गावातील रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात एकूण मृतांची संख्या 3 झाली आहे.

आज तब्बल 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये कुर्ली बौद्धवाडी 9, आचिर्णे 3, तांबेवाडी 3 ,कोकिसरे 1 समावेश आहे. कोकिसरे येथील कोरोनाने मृत झालेल्या त्या वृद्धाचे 12 सप्टेंबर रोजी स्वँब घेण्यात आले होते. 14 सप्टेंबर रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर जिल्हा ग्रामीण रुग्णालय उपचार सुरु होते. बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर तिथवली येथील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्या महिलेवर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

अभिप्राय द्या..