भाजप प्रदेश चिटणीस मा.आमदार प्रमोद जठार यांनी केंद्र सरकारने चिपळूण नगरपरिषदला दोन कोटी निधी दिल्याबद्दल मानले आभार

भाजप प्रदेश चिटणीस मा.आमदार प्रमोद जठार यांनी केंद्र सरकारने चिपळूण नगरपरिषदला दोन कोटी निधी दिल्याबद्दल मानले आभार

चिपळूण /-

भाजप प्रदेश चिटणीस मा.आमदार प्रमोद जठार यांनी केंद्र सरकारने चिपळूण नगरपरिषद ला 2 कोटी निधी दिल्याबद्दल मानले केंद्र सरकार चे आभार!!!!रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला दिला इशारा आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस मा आमदार प्रमोद जठार यांनी चिपळूण प्रांत कार्यालयात भेट दिली यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी श्री पाटील चिपळूण प्रांतसाहेब, तहसीलदार इत्यादी उपस्थित होते या चर्चेदरम्यान जठार यांनी राज्यसरकारने अद्याप तात्काळ करावयाची मदत 15000 अजून दिली नाही याबाबत नाराजी व्यक्त केली तसेच जर ती मदत रोख रक्कम स्वरूपात देता येत नसेल तर चेक स्वरूपात द्या असे जिल्हाधिकारी यांना सांगितले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने चिपळूण नगरपरिषदेच्या खात्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2 कोटी रुपयाचा निधी दिल्याबद्दल मा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आभार व्यक्त करताना चिपळूण नगरपरिषद ने सदरचा निधी तात्काळ वापरावा असे सांगितले तसेच या निधी बाबत नगराध्यक्षा व संबंधित अधिकाऱ्यांना निधी शासकीय कर्मकांडात अडकून राहू नये याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले सदरचा निधी जर 8 दिवसात वापरला नाही तर आपण संबंधीत अधिकारी कर्मचार्यांवर व चिपळूण प्रशासनावर गुन्हे दाखल करू असा इशारा श्री जठार यांनी दिला .

भारतीय जनता पक्षाच्या चिपळूण च्या वतीने वाटप करण्यात येणाऱ्या मदत केंन्द्राला जठार यांनी भेट घेत येत्या 2 दिवसात 56 टन साहित्य जमा होणार असून भाजप कार्यकर्त्यांनी योग्य प्रकारे नियोजन करण्याचे आवाहन केले यावेळी भाजप संघटन मंत्री श्री शैलेंद्र दळवी,संतोष मालप, तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर, चिपळूण शहर अध्यक्ष आशिष खातू,कामगार आघाडी प्रमुख राजेश शेट्ये, राजू भाटेलकर व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

अभिप्राय द्या..