गांजा प्रकरणातील मुख्य सुत्रधार कलमठ मधील गांजा किंग संकेत उर्फ सनी महेंद्रीकर गजाआड.;कुडाळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी..

गांजा प्रकरणातील मुख्य सुत्रधार कलमठ मधील गांजा किंग संकेत उर्फ सनी महेंद्रीकर गजाआड.;कुडाळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी..

कुडाळ /-

संपूर्ण जिल्ह्यात गांजा विक्रीचे रॅकेट पसरले असून सावंतवाडीतील बॉबीच्या चौकशीत कणकवली कलमठ येथील संकेत ऊर्फ सनी महेंद्रिकर याचे नाव पुढे आल्यानंतर कुडाळ पोलीसांनी त्याचा शोध घेत होते. अनेक ठिकाणी छापेमारी ही केली होती. मात्र तो सापडत नव्हता. पण शुक्रवारी रात्री तो कुडाळच्या दिशेने येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पणदूर नजीक गाडी आडवी घालत फिल्मी स्टाईलने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून 16 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. हा आरोपी जिल्ह्यात गांजा पुरवण्याचे काम करत होता.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या मदतीने कुडाळ पोलिसांनी सुरूवातीला चौघांना ताब्यात घेतले होते. यातील मुख्य सुत्रधार बॉबी उर्फ फैजल बेग याच्या कडे पोलीसांना तीन किलो गांजा आढळून आला होता. त्याने तो सावंतवाडीतील आपल्या घरात ठेवला होता. त्यामुळे या रॅकेटमध्ये अजून अनेक जण असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलीसांकडून बॉबीची कसून चौकशी करण्यात आली होती. त्यात सकेंत ऊर्फ सनी याचे नाव पुढे येत होते. त्याच्या शोधासाठी कुडाळ पोलीसांनी अनेक ठिकाणी छापेमारीही केली होती. पण हे गांजा प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा सनी भूमिगत झाला होता. अखेर शुक्रवारी रात्री. संकेत महेंद्रीकर हा कणकवलीहून कुडाळच्या दिशेने येणार असल्याचे समजताच कुडाळ पोलीसांनी पणदूर पुलानजीक गाडी आडवी घालत या सनीला ताब्यात घेतले. यात तपास अधिकारी सागर शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी स्वप्नील तांबे, अजय फोंडेकर, महिला कर्मचारी गोलतकर आदि सहभागी झाले होते. त्यानंतर त्याची तहसिलदारांसमोर झाडाझडती घेण्यात आली असता त्याच्याकडून 16 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. हा सनी या सर्व गांजा प्रकरणातील मुख्य सुत्रधार असून जिल्ह्यातील अनेकांना त्याच्याकडून गांजा पुरवठा होत होता. असे पोलीसांचे म्हणणे आहे. मात्र या गांज्याचा मुख्य स्त्रोत अद्याप पोलीसांना सापडला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अभिप्राय द्या..