वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार..

वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार..


वेंगुर्ला /-

1वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे तौक्ते चक्रीवादळात उत्तम सेवा बजावणाऱ्या वीज वितरणच्या कामगारांचा, तसेच कोरोना कालावधीत चांगली सेवा बजावणारे १०८ चे वाहनचालक, कोरोना योद्धा अशा एकुण १२० जणांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, रोप, व रेनकोट देवून शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर,उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, बाळा दळवी, सचिन देसाई,शहर प्रमुख अजित राऊळ, न.प.उपनगराध्यक्षा
अस्मिता राऊळ,
, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले,महिला शहर संघटक मंजुश्री आरोलकर, श्वेता हुले,शहर समन्वयक विवेकानंद आरोलकर, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, आदी उपस्थित होते. यावेळी १२० जणांचा संजय पडते व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अभिप्राय द्या..