तुळस येथे वृक्षारोपण करून कांदळवन दिन साजरा..

तुळस येथे वृक्षारोपण करून कांदळवन दिन साजरा..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे २६ जुलै ‘आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनाचे’ औचित्य साधून महाराष्ट्र शासन वन विभाग कांदळवन कक्ष मालवण, कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करून कांदळवन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी तुळस नदीकिनारी परिसरात कांदळ प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले. नदी किनार पट्टीची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतचा शेत जमिनीचा भाग ही पाण्याखाली येत असल्याचा धोका भविष्यात असल्याने जमिनीची धूप रोखणे आणि जैवविविधतेमध्ये कांदळवनाचे महत्व जाणून वृक्षारोपण करत आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन साजरा करण्यात आला.वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष मालवण दिपक सोनवणे यांचा मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला.यावेळी यु एन डी पी जिल्हाप्रकल्प यांनी स्थानिक उपलब्ध नैसर्गिक घटकांपासून मूल्यवर्धित पदार्थ कशा प्रकारे करता येतील याबाबत चर्चा व मार्गदर्शन केले.उपजीविका तज्ञ केदार पालव यांनी कांदळवन महत्व व संवर्धन आणि उपजीविका निर्माण योजना याबाबत माहिती दिली. यावेळी तुळस वनरक्षक सावळा कांबळे, कांदळवन कक्ष मालवणचे वनरक्षक सागर पांढरे, यू एन डी पी -जी सी एफ प्रकल्प जिल्हा समन्वयक अधिकारी, सिंधुदुर्ग रोहित सावंत, कांदळवन प्रतिष्ठान चे उपजीविकातज्ञ सिंधुदुर्ग केदार पालव, वेंगुर्ले प्रकल्प समन्वयक अमित रोकडे, प्रकल्प समन्वक दिगंबर तोरसकर, रुपेश कांदळगावकर, गुरुदास तिरोडकर,वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर,सचिव प्रा.सचिन परुळकर, उपाध्यक्ष रविंद्र राऊळ, महेश राऊळ, किरण राऊळ, नाना सावळ, रोहन राऊळ,भदु सावंत, सदाशिव सावंत आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..