वेंगुर्ला /-


भाजपा तर्फे पक्षवाढीसाठी वेगवेगळी अभियान राबविण्यात येतात.त्यामुळे पार्लमेन्ट ते पंचायत पोहोचलेला विस्तार आता बुथ पर्यंत होण्यासाठी,तसेच बुथप्रमुख व बुथसमिती सक्षम करण्यासाठी शक्ती केंद्र प्रमुख नेमलेले आहेत .या शक्ती केंद्र प्रमुखांच्या माध्यमातून बुथसमिती गठीत करून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याकरीता समर्थ बुथ अभियानाचे आयोजन केले असल्याचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी सांगितले .
वेंगुर्ले तालुक्यामध्ये २१ शक्ती केंद्र निहाय बैठकीचे आयोजन केले आहे व त्याचा शुभारंभ उभादांडा जि.प. मतदार संघातील आसोली शक्ती केंद्रामधील सागरतीर्थ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर ,रेडी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर,ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस,आसोली शक्ती केंद्र प्रभारी सुजाता देसाई,शिरोडा उपसरपंच राहुल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.६ जुलै ते १७ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेले समर्थ बुथ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांची फळी तयार करून,बेसिक बरोबर महिला मोर्चा, युवा मोर्चा यांचीही कमिटी तयार करण्यात येणार आहे.यावेळी आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर यांनी वेंगुर्ले तालुक्यात सर्वप्रथम आपल्या शक्ती केंद्रातील बुथरचना परिपूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सागरतीर्थ बुथप्रमुख बाळु वस्त ,आसोली बुथप्रमुख गुरुनाथ घाडी,न्हैचीआड बुथप्रमुख संकेत धुरी,जोसोली बुथप्रमुख सचिन गावडे,अनु.जाती मोर्चा चे बाळा जाधव,बाळकृष्ण कुडव,राधाकृष्ण बागकर, सविता देवजी,विराज वस्त, अनुराधा मोटे,स्वप्निल बागकर, प्रथमेश बागकर,देवेंद्र वस्त, शैलेश बागकर,अक्षय बागकर , रुपेश बागकर,अंकित बागकर, सचिन वस्त,वृंदा वस्त,वासंती खोर्जुवेकर आदी उपस्थित होते.यावेळी सागरतीर्थ बुथ मध्ये महिला बुथप्रमुख म्हणून अनुराधा बाळकृष्ण मोटे व युवा मोर्चा बुथप्रमुख म्हणून स्वप्निल लक्ष्मण बागकर यांची नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page