दोडामार्गमद्धे विकास कामाच्या मुद्द्यावरून सेना-भाजपच्या १८ कार्यकर्त्यांनवर गुन्हे दाखल

दोडामार्गमद्धे विकास कामाच्या मुद्द्यावरून सेना-भाजपच्या १८ कार्यकर्त्यांनवर गुन्हे दाखल

दोडामार्ग /-

दोडामार्गमद्धे विकास कामाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर आमने-सामने येणाऱ्या शिवसेना व भाजपाच्या १८ कार्यकर्त्यांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैरकायदा जमाव केल्याने मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी दिली.काल या ठिकाणी शिवसेना व भाजपचे पदाधिकारी विकास कामाच्या मुद्द्यावरून व्हाट्सअप ग्रुप वर झालेल्या वादानंतर आमने-सामने आले होते. दोघात जोरदार ठिणगी पडली होती. यावरून दोघांनीही एकमेकांना इशारा दिला होता. मात्र पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे हा सर्व प्रकार टळला होता. त्या प्रकरणी दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले होते. उशिरा या प्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अभिप्राय द्या..