निती आयोगाची घनकचरा व्यवस्थापनाला भेट..

निती आयोगाची घनकचरा व्यवस्थापनाला भेट..

वेंगुर्ला /-

‘स्वच्छतेचा वेंगुर्ला पॅटर्न‘चा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय निती आयोगाच्या नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका असणा-या सेंटर ऑफ सायन्स अॅण्ड एनव्हॉरमेंट या संस्थेच्या पथकाने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाला भेट देऊन पाहणी केली.
घनकचरा व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या देशातील २६ शहरांची निती आयोगाने निवड केली आहे.वेंगुर्ले शहराबरोबरच आंध्रप्रदेशातील एका शहराची कच-यापासून सेंद्रीय खत निर्मितीच्या प्रकल्पाची आदर्श प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली आहे. या केंद्रीय पथकाने दोन दिवस शहरातील विविध भागात जाऊन खत निर्मिती प्रकल्प व खतांचा दर्जा याबाबतचा विस्तृतपणे अहवला तयार करुन तो नीती अयोगाकडे पाठविण्यात आला. या देशातील २६ शहरांमधून ५ शहरांची निवड ‘पथदर्शी प्रकल्प‘ म्हणून निवड होणार आहे. यानंतर केंद्रीय निती आयोगातर्फे संपूर्ण देशात अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्याकरिता ‘कृती आराखडा‘ तयार केला जाणार आहे.या पथकाचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी स्वागत केले. यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, प्रशांत आपटे, विधाता सावंत, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल आदी उपस्थित होते.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीची दखल केंद्रीय निती आयोगाने घेणे ही शहरासाठी भूषणावह गोष्ट आहे. वेंगुर्ले शहरातील नागरिकांच्या, सर्व नगरसेवकांच्या व कर्मचा-यांच्या सहकार्यामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी केले.

अभिप्राय द्या..