तुळस येथे सात्विक ‘गोमेय’ गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न..

तुळस येथे सात्विक ‘गोमेय’ गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न..

वेंगुर्ला /-


लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग व परिवर्तन केंद्र – वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि प्रवण शेतकरी उत्पादक कंपनी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे सात्विक गोमय मूर्ती निर्मिती एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.आपल्या भारतीय संस्कृतीत देशी गायीला अनन्य साधारण महत्व आहे. देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि उपलब्ध माती यापासून सात्विक पर्यावरणपुरक आणि वजनाने हलक्या असणाऱ्या आणि ‘पीओपी’ ला पर्याय ठरणाऱ्या सात्विक ‘गोमेय’ गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस गणेश मूर्तीकार यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी तज्ञ मार्गदर्शक विलास मळगावकर यांनी सर्व प्रशिक्षणार्थीना मूर्ती आणि त्यासाठी लागणारे ‘मटेरियल’ कसे तयार करावे याचे प्रात्याक्षिकासहित सखोल मार्गदर्शन केले.सात्विक ‘गोमेय’ गणेश मूर्तीना मोठी मागणी असून,या मूर्ती पर्यावरणपूरक आहेत, यातून आपला मूर्तिकार वर्षभर मुर्त्या तयार करून स्वतःची उन्नती सोबत देशी गायी आणि पर्यावरण याचे संरक्षण करू शकतात, असे प्रतिपादन लुपिन चे नारायण परब यांनी केले.यावेळी व्यासपीठावर लुपिन चे संतोष कुडतरकर, प्रतिष्ठान चे सचिव प्रा.सचिन परुळकर,अजय नाईक,गुरुदास तिरोडकर, प्रसाद परुळकर,महेश राऊळ,किरण राऊळ,मिलन नाईक,सचिन गावडे,सदन वराडकर, अनिल परुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रशिक्षणार्थीनी या वेगळ्या कार्यशाळेच्या आयोजनाविषयी आयोजक संस्थाचे आभार व्यक्त करीत गोमेय जास्तीतजास्त मुर्त्या तयार करणार असल्याचे सांगितले.

अभिप्राय द्या..