पवार कुटूंबियांकडून केरवडे कर्याद नारूर नंबर १ शाळेला चार संगणक व प्रिंटर भेट..

पवार कुटूंबियांकडून केरवडे कर्याद नारूर नंबर १ शाळेला चार संगणक व प्रिंटर भेट..

कुडाळ /-

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केरवडे कर्याद नारूर नंबर १ शाळेला अमोल तुकाराम पवार कुटुंबाकडून चार संगणक व एक प्रिंटर भेट देण्यात आला. श्री तुकाराम चिलू पवार यांच्या स्मरणार्थ A T PAWAR & CO चे मालक अमोल पवार व ज्योती पवार यांच्याकडून केरवडे कर्याद नं १ शाळेला सुमारे १ लाख ३० हजार किमतीचे चार संगणक व एक प्रिंटर भेट म्हणून देण्यात आली. यावेळी संगणक व प्रिंटर जोडणी साठी सचिन कोळेकर व त्यांचे सहकारी तसेच गावचे सरपंच तुषार परब, प्रशालेच्या मुख्याध्यापक चंद्रकांत धुरी, उपशिक्षक दिपा चंद्रशेखर परब, प्रकाश कडव, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक इत्यादी उपस्थित होते. प्रशालेमार्फत सर्व उपस्थितांचे तसेच श्री तुकाराम चिलू पवार यांचे स्वागत व आभार मानण्यात आले. या संगणकांना आवश्यक व्होल्टेज मिळण्यासाठी त्या क्षमतेच्या युपीएस ची आवश्यकता आहे. तरी याबाबत शाळेकडून आवाहन करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..