You are currently viewing जिल्हा कलाध्यापक संघटनेचा कलाशिक्षक रणजित दळवी यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात..

जिल्हा कलाध्यापक संघटनेचा कलाशिक्षक रणजित दळवी यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात..

कणकवली /-

कळसुली हाय.येथे कार्यरत असलेले कलाशिक्षक रणजित अंकुश दळवी यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्याचे धैर्य त्यांच्या कुटुंबियांना यावे शिवाय आपल्या सहकारी व्यक्तीच्या कुटुंबीयांना आधार देण्याच्या उद्देशाने महाराष्ट राज्य कलाध्यापक संघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग‌‌‌च्यावतीने जिल्ह्यातील सर्व कलाध्यापकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व कलाध्यापकांनी मोठ्या संख्येने संघटनेच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला परिणामी रू. ६०,५०० एवढी रक्कम जमा झाली. शनिवारी १७ जुलै २०२१ रोजी कळसुली हायस्कूल चे चेअरमन के. एस. दळवी व कळसुली गावचे सरपंच साक्षी परब यांच्या उपस्थितीत जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष रुपेश नेवगी इतर पदाधिकारी समिर चांदरकर, संभाजी कोरे, आर.जी कांबळे, महामंडळाचे विभागिय उपाध्यक्ष बी जी सामंत व इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत जमा झालेली रक्कम रणजित दळवी सर यांच्या पत्नी माधवी दळवी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून दळवी कुटुंबीयांना दिलेल्या आधाराबद्दल गावच्या सरपंचांनी संघटनेच्या या कार्याबद्दल विषयी आभार मानले.

अभिप्राय द्या..