You are currently viewing वेंगुर्लेतून दहावीतून परूळेची वृणाली माडये प्रथम..

वेंगुर्लेतून दहावीतून परूळेची वृणाली माडये प्रथम..

वेंगुर्ला /-


महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परूळे मधील विद्यार्थीनी वृणाली माडये हिने ९९.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला.तर श्री देवी सातेरी हायस्कुल वेतोरेच्या पूर्वा तिरोडकर हिने ९८ टक्के गुणांसह द्वितीय व वेंगुर्ला हायस्कुल वेंगुर्लेच्या प्रणव मालवणकर याने ९७.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत तालुक्यातील हायस्कुल मधील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश पुढील प्रमाणे आहे. श्री माऊली विद्यामंदिर रेडी या विद्यालयातून परीक्षेस बसलेल्या ३१ पैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून समिधा रावजी राणे हिने ८६.८० टक्के गुणांसह प्रथम, वृध्दीका प्रदिप कृष्णाजी हिने ८४.६० टक्के गुणांसह द्वितीय तर किर्ती प्रकाश राणे हिने ८३.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परूळे या विद्यालयामधून परीक्षेस बसलेल्या ४६ पैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून वृणाली शरद माडये हि ९९.६० टक्के गुणांसह पहिली, लिनता विलास मुंडये हिने ९५.२० टक्के गुणांसह द्वितीय तर जय दिपक घारे हा ९५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविले. श्री देवी सातेरी हायस्कुल वेतोरे, वेंगुर्ले या विद्यालयातून परीक्षेस बसलेल्या ११७ पैकी ११७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून पूर्वा विक्रम तिरोडकर हिने ९८ टक्के गुणांसह प्रथम, प्रणव विश्वनाथ नाईक याने ९२ टक्के गुणांसह द्वितीय तर नेत्रा शंकर नाईक हिने ९१.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमाक पटकाविला. वेंगुला हायस्कुल वेंगुर्ला या हायस्कुलमधून परीक्षेस बसलेल्या १०९ पैकी १०९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.या हायस्कुलमधून प्रणव रविंद्र मालवणकर याने ९७.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, सुयोग चारूदत्त जोशी याने ९६.६० टक्के गुणांसह द्वितीय तर विभांशू राजेश्वर उबाळे व राज नारायण गोडकर यांनी ९२.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. रा. कृ. पाटकर हायस्कुल, वेंगुर्ले या हायस्कुलमधून परीक्षेस बसलेल्या ४५ पैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या हायस्कुलमधून

हेमा विनोद चव्हाण हिने ४५६ गुणांसह प्रथम क्रमांक, स्वाती विकास मेस्त्री व ईशा मधुकर सुर्वे यांनी ४५३ गुणांसह द्वितीय तर राजलक्ष्मी प्रविण गिरप हिने ४२४ गुणंसह तृतीय क्रमांक पटकाविला.
न्यु इंग्लिश स्कुल दाभोली वेंगुर्ले या हायस्कुलमधून परीक्षेस बसलेल्या ३२ पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या हायस्कुलमधून स्वयं चंद्रशेखर येरागी व दिक्षा सखाराम केळजी यांनी ४४३ गुणांसह प्रथम, त्रिवेणी सुभाष दाभोलकर हिने ४१६ गुणांसह द्वितीय तर दिप्ती किरण कांबळी हिने ४०४ गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.
कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कुल आडेली या हायस्कुलमधून परीक्षेस बसलेल्या ४४ पैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.या हायस्कुलमधून मंगल प्रविण शेणई हिने ४७५ गुणांसह प्रथम, गौरवी अंकुश दाभोलकर हिने ४६४ गुणांसह द्वितीय तर सुजित विठ्ठल गोवेकर याने ४५६ गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.
स.का.पाटील विद्यामंदिर केळूस या हायस्कुलमधून परीक्षेस बसलेल्या ३४ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.या हायस्कुलमधून वैष्णवी सखाराम कोरगावकर हिने ९४.२० टक्के गुणांसह प्रथम, अनुजा राजेश सामंत हिने ९१.८० टक्के गुणांसह द्वितीय तर योगेश्वरी गोविंद केळूसकर हिने ८५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
अ. वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा या विद्यालयातून परीक्षेस बसलेल्या ९९ पैकी ९९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून निष्ठा दिलीप गवंडे हिने ९३.४० टक्के गुणांसह प्रथम, ईशा धृवबाळ सावंत हिने ९३ टक्के
गुणांसह द्वितीय तर तराना नागेश नाईक हिने ९०.८० टक्के गुणंसह तृतीय क्रमांक पटकाविला.
न्यु इंग्लिश स्कुल, उभादांडा या विद्यालयातून परीक्षेस बसलेल्या ५३ पैकी ५३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून प्रथम सृष्टी जनार्दन मयेकर ४७२ गुण, द्वितीय लिलावती आनंद केळूसकर-४६४ गुण, तृतीय-प्रणिता तुकाराम गावडे- ४५८ गुण पटकाविले.
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल, रामघाट रोड वेंगुर्ले या विद्यालयातून परीक्षेस बसलेल्या ३० पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या स्कुलमधून प्रथम आदित्यराज शिवदत्त सावंत ९७.२० टक्के, द्वितीय प्राची शशांक तुळसकर ९५.२० टक्के, तर मिताली मनोहर कांबळी हिने ९४.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.
रा.धों.खानोलकर हायस्कुल मठ या हायस्कुलमधून परीक्षेस बसलेल्या १९ पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या हायस्कुलमधून प्रथम समृध्दी दिनेश परब हिने ७५.२० टक्के गुणांसह प्रथम, साक्षी भरत शिंदे हिने ७४.८० टक्के गुणांसह द्वितीय तर ऋतुजा सुरेश धुरी हिने ७४ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.
अणसूर-पाल हायस्कुल, अणसूर या विद्यालयातtन परीक्षेस बसलेल्या ३३ पैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल आहे. या विद्यालयातून धनश्री कृष्णा गावडे हिने ८५.२० टक्के गुणांसह प्रथम, पद्मजा सुधीर नाईक हिने ८४.८० टक्के गुणांसह द्वितीय तर साक्षी नारायण आंगचेकर हिने ८२.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमाक पटकाविला.
शिवाजी हायस्कुल तुळस
या हायस्कुलमधून परीक्षेस बसलेल्या ३२ पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.या हायस्कुलमधून सानिका अरूण मांजरेकर हिने ९२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, वैष्णवी गोपीचंद कुडतरकर व अनुराग ज्ञानदेव ठुम्बरे यांनी ८७.२० टक्के गुणांसह द्वितीय तर सिध्दी पांडुरंग परब हिने ८६.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटाकाविला.
न्यु इंग्लिश स्कुल मातोंड
या हायस्कुलमधून परीक्षेस बसलेल्या २२ पैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या हायस्कुलमधून राज जनार्दन परब याने ८८.८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, गौरेश कृष्णा परब व राज श्रीराम मातोंडकर यांनी ८३.६० टक्के गुणांसह द्वितीय तर दिपक जयराम परब याने ८२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.
आसोली हायस्कुल आसोली या हायस्कुलमधून परीक्षेस बसलेल्या ३४ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.या हायस्कुलमधून उत्तम विश्वजित चिपकर याने ९६.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, शिवराम नंदकुमार धुरी याने ९४.८० टक्के गुणांसह द्वितीय तर वेदांग राजेंद्र धुरी याने ८७.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.
सरस्वती विद्यालय आरवली-टाक या हायस्कुलमधून परीक्षेस बसलेल्या २१ पैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या हायस्कुलमधून चित्रावली प्रमोद गवंडे हिने ९४.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक,रूचा पंकज नाईक हिने ८१.६० टक्के गुणांसह द्वितीय तर आदित्य विष्णू फटनाईक हिने ८१ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.
मदर तेरेसा इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ले
या हायस्कुलमधून परीक्षेस बसलेल्या ४७ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या हायस्कुलमधून प्राची सतिश केळूसकर हिने ९४.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, लक्ष्मी प्रभू-खानोलकर हिने ९३ टक्के गुणांसह द्वितीय तर मिताली चंद्रशेखर कोयंडे हिने ९२.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.
हायस्कुलमधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..