केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक यांच्याकडे घातले साकडे!ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करा.;अतुल बंगे..

केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक यांच्याकडे घातले साकडे!ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करा.;अतुल बंगे..

कुडाळ /-

ओबीसी समाजाचे आरक्षण मिळावे यासाठी आपण केंद्रातील वजनदार केंद्रीय मंत्री आहात म्हणून प्रयत्न करा तसेच आपणास नवीन मिळालेली केंद्रीय बंदर आणि पर्यटन ही दोन महत्त्वाच्या खात्यांकडुन बंदरांचा आणि पर्यटन विकासासाठी निधी मिळावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हाध्यक्ष अतुल बंगे यांनी आज गोवा येथे केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक यांच्या कडे केली.

ना नाईक यांची गोवा येथील निवासस्थानी श्री बंगे यांनी भेट घेऊन ओबीसी आरक्षण मुद्यावर सविस्तर चर्चा केली यावेळी ना नाईक यांना केंद्रातील बंदरे आणि पर्यटन या दोन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाच्या वतीने विशेष अभिनंदन करुन राजकीय ओबीसी आरक्षण रद्द झाले त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे आपण केंद्रातील वजनदार मंत्री तसेच भंडारी समाजाचे राष्ट्रीय नेते आहात आपले असलेले राजकिय वजन ओबीसींच्या पाठीशी ठेऊन कायमचे ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी आपण प्रयत्न कराल याची खात्री आहे असे सांगून श्री बंगे म्हणाले भंडारी समाज आज आपणाकडे आशेने पहात आहे.

या वेळी श्री बंगे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारी अनेक गावे आहेत यामध्ये तीथला मच्छीमार अशा समुद्र किनारी आपला व्यवसाय करत असताना अनेक समस्यांना सामोरे जात आहेत त्यासाठी बंदरांचा विकास आणि आपल्या कडे असलेल्या पर्यटन खात्यांतर्गत निधी देऊन पर्यटनावर भर द्यावा अशी मागणी श्री बंगे यांनी केली .या वेळी बंगे म्हणाले यापूर्वी केंद्रीय आयुष मंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयुष खात्यांकडुन खासदार विनायक राऊत यांनी मागणी केलेली आपण कामे केलीत तसाच फायदा आपणांस मिळालेल्या खात्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नक्की मिळेल असा आशावाद श्री बंगे यांनी व्यक्त केला यावेळी सुमारे दीडतास चर्चा बंगे आणि ना नाईक यांच्यामधे झाली यावेळी कुडाळ शिवसेना तालुका संघटक बबन बोभाटे, तेंडोली युवासेनेचे विभाग प्रमुख शंकर पाटकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..