You are currently viewing जमियत उलेमा ए हिंद, कुडाल शाखेतर्फे कुडाळ येथील “महिला व बाल रूग्णालयाला” पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा…

जमियत उलेमा ए हिंद, कुडाल शाखेतर्फे कुडाळ येथील “महिला व बाल रूग्णालयाला” पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा…

कुडाळ /-

कोरोना साथरोग काळात कुडाळ तालुक्यात पेशंटस् वाढत असल्याने कुडाळ येधील “महिला व बाल रूग्णालयातील” आयसेलेशन सेंटर मध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याची कमतरता भासत असल्याचे समजताच “जमियत उलेमा ए हिंद, कुडाळ शाखेद्वारे रविवार दिनांक 18/07/2021 रोजी पिण्याच्या पाण्याचे 20 बॉक्स चा पुरवठा करण्यात आला.

यावेळी “जमियत उलेमा ए हिंद, चे कार्यकर्ते हाफीज झैद, मौलाना अल्ताफ, मौलाना सगीर, अय्याज खान, रिझवान मणीयार, मुबीन दोस्ती, इरफान करोल, माजी नगरसेवक एजाज नाईक आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..