ऑस्ट्रेलिया येथील गिरीश मरकाळे यांनी दिल्या कळसुलकर हायस्कूलमधील गरजू विद्यार्थिनींना सायकल…

ऑस्ट्रेलिया येथील गिरीश मरकाळे यांनी दिल्या कळसुलकर हायस्कूलमधील गरजू विद्यार्थिनींना सायकल…

सावंतवाडी/-

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी मधील तीन विद्यार्थिनींना श्री गिरीश बी मरकाळे (ऑस्ट्रेलिया)* यांनी दिलेल्या देणगीतून सायकल प्रदान करण्यात आल्या. प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री विष्णू शिरोडकर यांच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया स्थित श्री गिरीश बी मरकाळे यांनी प्रशालेतील विद्यार्थिनींसाठी रुपये १५ हजार रुपयांची देणगी सायकल खरेदी करण्यासाठी दिली होती. त्यामधून इयत्ता सातवीतील कुमारी काव्या सुधीर बावकर (कोलगाव), इयत्ता सातवीतील कुमारी दुर्वा सुनील कासार (माजगाव) व इयत्ता आठवीतील कुमारी तन्वी विजय मेस्त्री (कोलगाव) या तीन विद्यार्थिनींना सायकलचे वितरण सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडीचे सचिव डॉक्टर श्री प्रसाद नार्वेकर, खजिनदार श्री मुकुंद वझे, सदस्य श्री रवींद्र स्वार, मुख्याध्यापक श्री एन. पी. मानकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक यांच्या उपस्थितीत कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करून करण्यात आले. या विद्यार्थिनीना ही मदत मिळवून देण्यात प्रशालेचे शिक्षक श्री पी. बी. बागुल यांनी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर यांच्या मार्गदर्शनातून विशेष मेहनत घेतली. श्री गिरीश मरकाळे यांनी गरजू विद्यार्थिनींना या माध्यमातून मदत केल्याबद्दल प्रशाला, संस्था व माजी विद्यार्थी संघ यांच्याकडून आभार मानण्यात आले.

अभिप्राय द्या..