कोलगाव भोमवाडी येथे आरोग्य उपकेंद्राला पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मंजूरी..

कोलगाव भोमवाडी येथे आरोग्य उपकेंद्राला पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मंजूरी..

जि.प.सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष मायकल डिसोजा यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश..

सावंतवाडी /-

शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले कोलगांव गावची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून ह्या साठी दुसरे आरोग्य उपकेंद्र असणे गरजेचे होते त्यासाठी गेली अनेक वर्ष जिल्हा परिषद सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष मायकल डिसोजा हे सतत पाठपुरावा करत होते, अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कोलगाव भोमवाडी ह्या उपकेंद्राला आज अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूरी दिली आहे. कोलगावचे शहरीकरण होत असल्याने कोलगावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या मुळे एकच उपकेंद्र ते अपुरे पडत होते दुसरे आरोग्य केंद्र भोमवाडी येथे व्हावे यासाठी मायकल डिसोजा यांचा सतत प्रयत्न सुरु होते अखेर त्याना यश आले असून या उपकेंद्र मुळे लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे हे उपकेंद्र मंजूर झाल्याबद्दल कोलगाव वासियांतर्फे जि.प.सदस्य मायकल डिसोजा यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहे.

अभिप्राय द्या..