सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे शतक झाले असून गेल्या चोवीस तासात सरासरी 156.72 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 198 मि.मी. नोंद झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1853.03 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 140(1895), सावंतवाडी – 190(2076.10), वेंगुर्ला – 159.80(1577.20), कुडाळ – 164(1756), मालवण – 198(2118), कणकवली – 146(1930), देवगड – 144(1687), वैभववाडी – 112(1865), असा पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आजपर्यंत सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 2 हजार 118 मि.मी. झाला असून सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात 1 हजार 577 पूर्णांक 20 मि.मी. झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page