कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी खारेपाटण येथील पूरस्थितीची केली पाहणी..

कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी खारेपाटण येथील पूरस्थितीची केली पाहणी..

कणकवली /-

गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खारेपाटण शुकनदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे संपूर्ण शहरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी आज दुपारी २.३० वाजता खारेपाटण गावाला तातडीची भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी कणकवली तालुका पोलिस निरीक्षक अजमुदिन मुल्ला, कणकवली तालुका प्रभारी नायब तहसीलदार सुजाता पाटील, कणकवली तालुका गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कणकवली मंडळ अधिकारी श्री. नागावकर, खारेपाटण मंडळ अधिकारी, मंगेश यादव, खारेपाटण ग्रामसेवक जी. सी. वेंगुर्लेकर, तलाठी उमेष सिंगनाथ आदी अधिकारी उपस्थित होते.खारेपाटण पुरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने पुरजन्य परिस्थितीत ज्या अत्यावश्यक गरजा असतील, त्या पुरविल्या जातील, तशा प्रकारच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी प्रशासनाला यावेळी केल्या आहेत.

अभिप्राय द्या..