पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्हादौऱ्यावर..

पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्हादौऱ्यावर..


सिंधुदुर्गनगरी,/-

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे बुधवार दि. 14 जुलै 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.बुधवार दि. 14 जुलै रोजी सकाळी 10.45 वा. मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे शिवसंपर्क अभियान शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11 वा. मातोश्री मंगल कार्यालय येथे संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर तसेच शिवसेना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित कोरोना योद्धा सत्कार कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11.45 वा. कणकवली येथून मोटारीने ओरोस-सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण, दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरण संदर्भात आढावा बैठक, दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, दुपारी 2.15 वा. ओरोस येथून मोटारीने दोडामार्ग आडाळीकडे प्रयाण, दुपारी 3.30 वा. तहसिलदार कार्यालय, दोडामार्ग येथे प्रादेशिक अधिकारी, एम.आय.डी.सी. रत्नागिरी – सिंधुदुर्ग. कार्यकारी अभियंता, उपअभियंता, एम.आय.डी.सी. यांच्या उपस्थितीत आडाळी एम.आय.डी.सी. आढावा बैठक, दुपारी 4.30 वा. मंदार हॉल, सासोली, ता. दोडामार्ग येथे शिवसंपर्क अभियान कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार दोडामार्ग येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, सोईनुसार शासकीय विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व राखीव.

अभिप्राय द्या..