विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीची सशर्थ जामिनावर मुक्तता…

विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीची सशर्थ जामिनावर मुक्तता…

कणकवली /-

तालुक्यातील दारीस्ते येथील सुनिल राजाराम पवार (वय ४८ वर्षे) राहनार दारीस्ते, ता- कणकवली याला शस्त्र अधिनियम कायदा १९५९ चे कलम ३, २५(१)(अ) चे गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांचेसमोर सोमवारी हजर करण्यात आले असता आरोपीची १५ हजार रुपयांच्या सशर्थ जामिनावर मुक्त करण्याचे आदेश मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. जमादार यांनी दिले. आरोपीच्यावतीने वकील राजेंद्र रावराणे व कु. प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.

गुरवार ८ जुलै रोजी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास फिर्यादी चंद्रहास श्रावण नार्वेकर पोकॉ/९७४ हे कणकवली उपविभागात शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना कणकवली तालुक्यातील दारीस्ते पवारवाडी येथिल श्री. भवानी मंदिराचे जवळ राहणारा सुनिल राजाराम पवार याच्याकडे एक काडतुसची सिंगल बँरलची बंदूक असून ती त्याने आपलय राहत्या घरासमोरील गवताच्या माचात लपवून ठेवलेली आहे, अशी बातमी त्यांना मिळाली होती. फिर्यादी यांनी सुनिल राजाराम पवार यांच्या राहत्या घरासमोरील गवताच्या माचाची पाहणी केली असता गवताच्या माचामध्ये सिंगल बँरलची काडतुसाची बंदूक लपवून ठेवलेली मिळून आली. अशा आशयाची फिर्याद फिर्यादी चंद्रहास श्रावण नार्वेकर पोकॉ/९७४ यांनी कणकवली पोलिसात दिली होती. आरोपी याने गैरकायदा विना परवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करून त्याचे अटकेची कारवाई केली होती. सोमवारी आरोपीला कणकवली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजार केले असता आरोपीची सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अभिप्राय द्या..