दोडामार्ग तिलारी राज्य महामार्गावर अतिवृष्टीमुळे पुलावरून गेले पाणी..

दोडामार्ग तिलारी राज्य महामार्गावर अतिवृष्टीमुळे पुलावरून गेले पाणी..

भेडशीतील कॉजवे पाण्याखाली नदी-नाले तुडूंब:बोलेरो अडकली पुराच्या पाण्यात..

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्याला कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यात सर्वच नदी नाले तुडुंब भरले आहेत. याचदरम्यान भेडशीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप चालकाची गाडी या पाण्यात अडकली.पाणी गाडीच्या बॉनेट पर्यंत गेल्याने गाडी पाण्यातच अडकून पडली आहे.ही गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून केला जात आहे. तर पाणी नजीकच्या ख्रिश्चन सामाजाच्या दफनभूमी पर्यंत पाणी भरले होते. दोडामार्ग-तिलारी रस्त्यावर भेडशी खालचा बाजार येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कॉजवे पाण्याखाली गेला.

अभिप्राय द्या..