You are currently viewing पराग सावंत यांनी खारेपाटण कोविड सेंटर ला दिली 25,000 रुपयांची देणगी..

पराग सावंत यांनी खारेपाटण कोविड सेंटर ला दिली 25,000 रुपयांची देणगी..

कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर ला मुंबई येथील युवा उद्योजक पराग जनार्दन सावंत यांनी रोख 25,000/- रुपयांची देणगी दिली आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल त्यांचे खारेपाटण दशक्रोशीत अभिनंदन केले जात आहे. रामेश्वरनगर, खारेपाटण येथील कोविड केअर सेंटरला पराग सावंत यांनी सपत्नीक भेट दिली व कोविड सेंटरची पाहणी केली. सामाजिक बांधिलकी जपत पराग सावंत यांनी खारेपाटण कोविड सेंटर करिता खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्याकडे रोख 25,000 /- रुपयांची देणगी सुपूर्द केली. यावेळी पराग सावंत यांची पत्नी सुप्रिया सावंत, खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्या रीना ब्रम्हदंडे, कोविड सेंटर च्या स्टाफ नर्स ईच्छा राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पराग सावंत हे खारेपाटण या गावचे मूळ रहिवाशी असून मुबई येथे युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. तर सामाजिक कार्यात देखील कार्यरत आहेत. खारेपाटण कोविड सेंटरला तसेच खारेपाटण गावासाठी आपण मदत करणार असल्याचे पराग सावंत यांनी यावेळी सांगितले.

अभिप्राय द्या..