सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या 24 तासात पडलेल्या पावसात कणकवलीत सर्वाधिक पाऊस पडला…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या 24 तासात पडलेल्या पावसात कणकवलीत सर्वाधिक पाऊस पडला…

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १४७.३० मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक कणकवली तालुक्यात २१० मि.मी. पाऊस झाला आहे. १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी १४७१.२१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग- 138 (1524), सावंतवाडी – 105 (1643.10), वेंगुर्ला- 95.40 (1152.60), कुडाळ- 135 (1324), मालवण 152(1624), कणकवली – 210 (1602), देवगड – 140 (1360), वैभववाडी – 203 (1540), असा पाऊस झाला आहे.

अभिप्राय द्या..