वेंगुर्ले नगरपरीषदेच्या ‘सागररत्न’ मच्छी मार्केटचा ना.राणे व विरोधीपक्षनेते फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण..

वेंगुर्ले नगरपरीषदेच्या ‘सागररत्न’ मच्छी मार्केटचा ना.राणे व विरोधीपक्षनेते फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण..

वेंगुर्ला /-

केंद्रीय मंत्री नारायण राणे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण करण्यात आले.वेंगुर्ले नगरपरीषदेच्या ‘सागररत्न’ मच्छी मार्केटचा लोकार्पण सोहळा रविवारी सकाळी 11 वाजता केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने पार पडला.

या लोकार्पण सोहळा खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर, माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हा न. प. प्रशासन अधिकारी वैभव साबळे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी जिल्हयातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे, मनिष दळवी, जि.प. सदस्य दादा कुबल वेंगुर्ले मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन राजेंद्र कुबल, मच्छीमार नेते वसंत तांडेल, तहसिलदार प्रवीण लोकरे, नगरपरीषदेचे नगरसेवक प्रशांत आपटे, विधाता सावंत, शैलेश गावडे, धर्मराज कांबळी, नागेश गावडे, आत्माराम सोकटे, नगरसेविका शितल आंगचेकर, कृपा गिरप मोंडकर, स्नेहल खोबरेकर, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, कृतिका कुबल, पुनम जाधव, आदीसह निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..