शेर्पे येथील मारहाण प्रकरणी दोघांची जामिनावर मुक्तता..

शेर्पे येथील मारहाण प्रकरणी दोघांची जामिनावर मुक्तता..

कणकवली /-

क्रिकेट मंडळाच्या पैशांची मागणी करून मारण्याची धमकी देत दांड्याच्या साहाय्याने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या उदय आकाराम पवार (43) व मंदार आकाराम पवार (36, रा. शेर्पे- भटवाडी ता. कणकवली) यांची 15 हजाराच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली. आरोपींच्या वतीने ऍड.अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले. याबाबत शेर्पे – भटवाडी येथील वसंत बाबी पांचाळ यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम 326, 324, 323, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना 29 जून रोजी फिर्यादीच्या घराजवळ घडली होती. 29 जून रोजी फिर्यादी शेतातून काम करून घरी येत असताना आरोपी उदय पवार यांनी आपल्या घराजवळ फिर्यादीला बोलवत तुझ्या मुलाला सांभाळ नाही तर मारून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर उदय व मंदार पवार हे फिर्यादीच्या घरी जात फिर्यादीच्या ज्ञानदेव या मुलाला क्रिकेट मंडळाचे 5 हजार आणून दे असे सांगितले. त्यावर हे पैसे मी हेमंत पवार यांच्याकडे दिल्याचे सांगताच फिर्यादी उदय पवार यांने काठीने पायाच्या टाचेवर मारहाण करत गंभीर दुखापत केली. तर मंदार याने फिर्यादीला मानेला धरून जमिनीवर पाडले. अशी फिर्याद दाखल करण्यात आली. त्या नुसार आरोपीच्या विरोधात 30 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागण्यात आली. मात्र आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर संशयित आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपीनी पोलिस तपासाला सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव आणू नये, तपास कामात ढवळाढवळ न करणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

अभिप्राय द्या..