You are currently viewing नागरिकांना आजारांबद्दल मार्गदर्शन करून आरोग्य विभागाने राबविला हिवताप व डेंग्यू प्रतिरोध जनजागृती कार्यक्रम..

नागरिकांना आजारांबद्दल मार्गदर्शन करून आरोग्य विभागाने राबविला हिवताप व डेंग्यू प्रतिरोध जनजागृती कार्यक्रम..

मालवण /-

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून मच्छर तयार झाल्याने त्यांमार्फत निरनिराळे रोग फैलावतात. यात हिवताप, डेंग्यू, मलेरिया अशा रोगांचा समावेश असतो. त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने हिवताप व डेंग्यू प्रतिरोध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत आज मालवण शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग याविषयी नागरिकांमध्ये माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच विविध ठिकाणी साचलेल्या पाण्यात ऍबेटिंग (अळी नाशक औषध फवारणी) करण्यात आली.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून त्यात अळ्या निर्माण होऊन रोगराई पसरण्याची भीती असते. यात साचलेल्या स्वच्छ पाण्यात हिवताप, डेंग्यू यांच्या अळ्या तयार होतात. तर दुर्गंधीयुक्त पाण्यात हत्तीरोगाच्या अळ्या तयार होत असतात. या अळ्यांचा नाश करण्यासाठी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत आरोग्य विभागाकडून हिवताप व डेंग्यू प्रतिरोध मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मालवण शहरात विविध ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. यात मालवण बस स्थानक परिसरासह शहरातील प्रभाग, वाडी वस्त्या, रहिवासी संकुल आदी ठिकाणी डबकी, टायर, करवंट्या, ड्रम, प्लास्टिक बाटल्या आदींमध्ये साचलेल्या पाण्यात ऍबेटिंग म्हणजे अळी नाशक औषध टाकण्यात आले. तसेच साचलेल्या पण्याची विल्हेवाट लावण्याबद्दल आणि हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग या आजारांबाबत घ्यावयाची पूर्व काळजी याविषयी नागरिकांना माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत मालवण ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य सहाय्यक बी. आर. कोरडे, हत्तीरोग चिकित्सालय मालवणचे आरोग्य सेवक एस. ए. चांदोस्कर, मालवण शहराचे आरोग्य सेवक के. एन. माजिक आदी सहभागी झाले होते.

अभिप्राय द्या..