लोरे नं. १ उपसरपंचपदी रोहिणी रघुनाथ रावराणे यांची बिनविरोध निवड…

लोरे नं. १ उपसरपंचपदी रोहिणी रघुनाथ रावराणे यांची बिनविरोध निवड…

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत लोरे नंबर १ येथील माजी उपसरपंच अनंत भाऊ रावराणे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज रोहिणी रघुनाथ रावराणे यांची ग्रामपंचायत लोरे नंबर १ च्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडीबद्दल त्यांचे पंचायत समिती सभापती मनोज तुळशीदास रावराणे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. यावेळी लोरे नंबर १ ग्रामपंचायत सरपंच अजय तुळशीदास रावराणे, माजी सरपंच सुमन गुरव, ग्रामपंचायत सदस्य नरेश गुरव, सर्व ग्रा. पं. सदस्य तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश रावराणे व ग्रामसेवक एस. सी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..