मसुरे /-

जुन महिन्यात घेण्यात आलेल्या ऑनलाईन बिडीएस परीक्षेत जि. प. पू. प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या परीक्षेत प्रशालेतील पाच विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पाच पैकी चार विद्यार्थ्यांची मेडलसाठी निवड झाली आहे. त्यात कु.श्रावणी स्वप्नील सुर्वे इयत्ता २ री १०० पैकी ९८ गुण मिळवत गोल्ड मेडल, कु.सायली नागेश विरकर इयत्ता ३ री १०० पैकी ९६ गुण मिळवत गोल्ड मेडल, कु.संस्कार संभाजी पवार इयत्ता ४ थी १०० पैकी ८६ गुण मिळवत गोल्ड मेडलसाठी निवड, कु. राहुल संतोष गोसावी इयत्ता १ ली १०० पैकी ९४ गुण मिळवत सिल्व्हर मेडल मिळवले आहे. शाळेतील तीन विद्यार्थ्यांची गोल्ड मेडल व एका विद्यार्थ्याची सिल्व्हर मेडल मिळवले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक श्री. संभाजी पवार व श्री. यशवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विस्तार अधिकारी श्री. उदय दीक्षित, उपसरपंच श्री. दीपक सुर्वे, केंद्रप्रमुख श्री. प्रसाद चिंदरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.मयुरी हडकर, उपाध्यक्ष मा. श्री. प्रमोद सुर्वे, उद्योजक श्री. प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर आदींसह पालक, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page