You are currently viewing युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ /-

युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी आज दुसऱ्या टप्प्याचे कुडाळ येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात सरकारच्या सर्व कोव्हिड-19 नियमांचे पालन करून बैठक संपन्न झाली. आज सिंधुदुर्ग जिल्यात ज्यांना समाजसेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी संस्थेमध्ये सामील व्हावे असे संस्थेमार्फत जाहिर आव्हान करण्यात आले होते. अभियान चालू केल्यापासून आठ दिवसातच अनेक युवक व युवतींनी आज संस्थेचे स्वयमसेवकत्व स्वीकारले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, सचिव ॲड. हितेश कुडाळकर, संपर्कप्रमुख पूजा खानोलकर , सोलापुर प्रदेशाध्यक्ष श्रेयस खरबाडे,मिली मिश्रा,चिन्मय पोईपकर,मयुरेश उमळकर,श्रीषा बांदिवडेकर, सेजल शालबिद्रे, संतोष घाडी, शिवराम तवटे, सुषमा मांजरेकर, साक्षी मांजरेकर व अन्य संस्थेचे सदस्य व नवीन स्वयंसेवक व युवक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..