You are currently viewing सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा..

सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा..

आचरा /-

सेवानिवृत्त ग्रामसेवक , ग्रा.वि. अधिकारी , विस्तार अधिकारी यांना सेवानिवृत्ती नंतर ग्रामपंचायतीच्या थकीत रक्कम वसुलीच्या नोटिशी बजाऊन सदर रक्कमांची वसुली पेन्शन मधुन करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. याबाबत संघटना आक्रमक झाली असून हा प्रकार तातडीने न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.याबाबतचे निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांना संघटने तर्फे देण्यात आले आहे.
यावेळी ग्रामसेवक , ग्रा. वि. अधिकारी,विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राणे उपाध्यक्ष हनुमंत प्रभू सेवानिवृत्त कर्मचारी विस्तार अधिकारी दीपक देसाई , अशोक ओटवणेकर, डी. एस. दळवी, शिरोडकर विस्तार अधिकारी जाधव आदि उपस्थित होते.

सेवानिवृत्त ग्रामसेवक , ग्रा.वि. अधिकारी, विस्तार अधिकारी यांना सेवानिवृत्ती नंतर ग्रामपंचायतीच्या थकीत रक्कम वसुलीच्या नोटिशी बजाऊन सदर रक्कमांची वसुली पेन्शन मधुन करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे.कर्मचारी सेवेत असते वेळी पूर्तता करून घेण्याची संधी असताना ऑडिट मध्ये निघालेल्या शंकांची पुर्तता करून घेवून वासुलपात्र रक्कमा वसुल करून घेणेची संधी असतानाही तसे न करता निवृत्तीनंतर पेन्शन मधुन कापून घेण्याचा प्रकार प्रशासनाकडून कडून होत आहे. खरे पाहता कर्मचारी निवृत होतो त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर कर्मचाऱ्याकडे शासकीय येणे बाकी काही नाही असे दाखले घेऊनच पेन्शन केस पूर्ण करून पेन्शन चालू होते. असे असताना अशा प्रकारच्या रक्कमांची वसूली पेन्शन मधुन कशी होउ शकते असा सवाल सेवानीवृत्त ग्रामसेवक,ग्रा. वि. अधिकारी, विस्तार अधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश राणे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला विचारला आहे. सेवा निवृत्त होवून १५ ते २० वर्ष होउन गेल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना याची कशी काय जाग येते. काही सेवानिवृत्त ग्रामसेवक,ग्रा. वी. अधिकारी , विस्तार अधिकारी यांचे निधनही झाले आहे आणि आता त्यांचे नावे नोटिस येत आहेत हे योग्य नाही. हा सगळा प्रकार वेळीच थांबवावा अशा प्रकारचे निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले आहे. सदर बाबत योग्य ती पूर्तता न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असे राणे यांनी म्हटले आहे.

अभिप्राय द्या..