राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले..

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले..

मुंबई /-

पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने खडसेंनाही समन्स बजावलं होतं. ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्याअगोदरच प्रकृती बिघडल्याच्या कारणास्तव त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे खडसे ईडी चौकशीला जाणार की नाही, याबाबत तर्कवितर्क रंगले होते. परंतु सकाळी अकराच्या सुमारास ते अंमलबजावणी संचलनायच्या कार्यालयात दाखल झाले.पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथराव खडसे अडचणीत सापडलेले आहेत. जावयाच्या अटकेनंतर त्यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीने पाठवलेल्या नोटीसनुसार खडसे यांना आज गुरुवार दि.८ जुलै सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती. आजच्या पत्रकार परिषदेत खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळं आज होणारी पत्रकार परिषद रद्द करावी लागली आहे.

दरम्यान, यानंतर एकनाथराव खडसे चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार का?, की ईडीकडे चौकशीसाठी वेळ वाढवून मागणार? अशा चर्चांना उधाण आलं आहे. परंतु खडसे यांनी चौकशीकामी ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे. त्यानुसार ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहे.

अभिप्राय द्या..