You are currently viewing ट्रक -मोटरसायकल अपघातात वरवडे येथील मोटरसायकलस्वार जागीच ठार.;राजापूर पन्हाळे येथे घडला अपघात..

ट्रक -मोटरसायकल अपघातात वरवडे येथील मोटरसायकलस्वार जागीच ठार.;राजापूर पन्हाळे येथे घडला अपघात..

कणकवली /-

मुंबई गोवा महामार्गावर राजापूर पन्हाळे येथे मोटरसायकल व ट्रक यांच्यात अपघात घडला असून या भीषण अपघातात कणकवली तालुक्यातील वरवडे – फणसवाडी येथील मोटरसायकलचालक जयेश दिलीप जोशी ( वय 21 ) हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेला ओंकार गावकर हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडला. कणकवली तालुक्यातील वरवडे -फणसवाडी येथील जयेश दिलीप जोशी हा आपल्या ताब्यातील यामाहा आर 15 ही मोटरसायकल घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. मोटरसायकलवर ओंकार गावकर हा मागे बसला होता. राजापूर पन्हाळे येथे समोरून जाणाऱ्या ट्रकला मोटरसायकलची धडक बसली. धुक्यामुळे समोरून जाणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्यामुळे जयेश याने ब्रेक लावला असता मोटरसायकल स्लिप झाली आणि ट्रकला मागून आदळली. या अपघातात जयेश याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला ओंकार गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर जखमी ओंकार याला राजापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मयत जयेश याचे शव राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. या अपघाताचे वृत्त समजताच वरवडे फणसवाडी येथील हनुमंत बोंद्रे, भाई सादये यांनी घटनास्थळी धाव घेतली. जयेश याच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच फणसवाडीत हळहळ व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..