मोटारसायकल अपघातात युवकाचे निधन..

मोटारसायकल अपघातात युवकाचे निधन..

देवगड /-

देवगड तालुक्यातील मुणगे तिठा येथे झालेल्या मोटारसायकल अपघातात युवकाचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना. मुणगे देऊळवाडी येथील ललित चंद्रकांत परब ( वय २६ वर्ष) हा युवक आचरा ते मुणगे हा प्रवास मोटारसायकलने करत होता. मुणगे ग्रामपंचायत नजीक मुख्य रस्त्यावर त्याचा मोटारसायकल वरील ताबा सुटून मोटरसायकलची धडक रस्ता लगतच्या दिशादर्शक फलकास बसली. धडक बसल्या नंतर तो समोरील बाजूस फेकला जाऊन डोक्याला गंभीर मार लागला. ग्रामस्थांनी त्वरित त्याला मिठबाव आरोग्य केंद्रात अधिक उपचारासाठी दाखल केले होते. परंतु तत्पूर्वीच त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे. येथील प्रकाश परब यांचा तो पुतण्या होत. ललित हा उत्तम वाहन चालक होता. गतवर्षी लॉकडाऊन नंतर तो गावी आला होता. अधिक तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण करत आहेत. त्याच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..