You are currently viewing भटवाडी येथील बंद काजु कंपनित आढळली अजगराची नऊ पिल्ले.;कोकण वाईल्ड लाईफ सोडले नैसर्गिक अधिवासात..

भटवाडी येथील बंद काजु कंपनित आढळली अजगराची नऊ पिल्ले.;कोकण वाईल्ड लाईफ सोडले नैसर्गिक अधिवासात..

सिंधुदुर्ग /-

भटवाडी येथील बंद काजु कंपणीत आढळली अजगराची नऊ पिल्ले,आडेली भटवाडी येथील दिलीप गावडे हे लाकडं आणण्यासाठी गेले असता पावसामुळे त्यांना बाजुच्या बंद काजुच्या कारखान्यात आसरा घेण्यासाठी थांबावं लागलं तर त्यांना विटांच्या ढिगाऱ्यावर साप आढळला काही अंतरावर दुसरा साप आढळला. त्यांनी लगेचच याची माहिती कोकण वाईल्ड लाईफ चे दिपक दुतोंडकर यांना या संदर्भात माहिती दिली,दुतोंडकर यांनी घटनास्थळी धाव घेत ती अजगराची पिल्ले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं ती पकडल्यानंतर त्यांनी कोकण वाईल्ड लाईफ च्या अध्यक्षांना दुरध्वनी वरुन या घटनेची माहिती दिली.तर दिलीप गावडे यांनी या पिल्लांना लांब जंगलात सोडून देण्याची आग्रहाची मागणी केली.

पावसाळ्यात जुन,जुलै महिन्यात सापाची पिल्लं बाहेर येतात. या कारणानं कोकण वाईल्ड लाईफ ची टीम घटनास्थळी दाखल झाली पिल्लांना पाहिल्यावर ती चार ते पाच दिवसांची असावी असं अंदाजे वाटत होतं. आणि त्यांनी याची माहिती स्थानिक (मठ) वनविभागाला दिली.आणि रेस्कु आँपरेशन सुरू केलं. आणि तब्बल नऊ अजगराची पिल्ले रेस्क्यु टीम ला पकडण्यात यश आलं.यावेळी वनविभाग मठ वनरक्षक श्री.विष्णु नरळे तर कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम सिंधुदुर्ग चे अनिल गावडे, वैभव अमृस्कर, महेश राऊळ, दिपक दुतोंडकर आदी उपस्थित होते. लगेचच या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं.

अभिप्राय द्या..