दुचाकीवरून अवैध दारू विक्री करताना पकडले रंगेहाथ..

सावंतवाडी /-

सावंतवाडी शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्या एका तरुणावर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. यात पाच हजार रुपयांच्या दारूसह ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सालईवाडा परिसरात करण्यात आली. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, महेश कृष्णा वेंगुर्लेकर (३७) रा. सालईवाडा, असे त्याचे नाव आहे. संशयित हा आपल्या दुचाकीमधून ही दारू विक्री करत होता. यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करत मुद्देमाल जप्त केला.

अभिप्राय द्या..