अल्पवयीन युवती लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींचा अटकपूर्व जामिन अर्ज नामंजूर..

अल्पवयीन युवती लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींचा अटकपूर्व जामिन अर्ज नामंजूर..

मालवण /-

मालवण येथील अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अमित यशवंत आडवलकर ( रा.गवंडीवाडा मालवण ), गौरव सुरेंद्र प्रभू ( वायरी, ता.मालवण ) यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ऍड. रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

दि. २४ जून, २०२० रोजी अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अमित आडवलकर, सुमित सावंत व गौरव प्रभू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी आरोपी सुमित सावंत यास अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपींमार्फत अटकपूर्व जामिन अर्ज करण्यात आला होता. मात्र सरकारी वकील ऍड. रुपेश देसाई यांनी मांडलेल्या पुढील कारणांमुळे हा अटकपूर्व जामिन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. यात मांडल्याप्रमाणे, हा गुन्हा महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराचा गंभीर व संवेदनशील स्वरुपाचा आहे. यातील आरोपींची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. गुन्हा घडताना आरोपींनी केलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिलेली आहे. त्यानुषंगाने आरोपींचे मोबाईल जप्त करणे आवश्यक आहे. आरोपींनी पिडीत युवतीला धमकी दिल्याने तिच्या कुटुंबात भीतीचे व तणावाचे वातावरण आहे. अशावेळी जामिन अर्ज मंजूर झाल्यास आरोपी पुन्हा पिडीतेला धमकावून तिच्यावर दबाव आणू शकतात. त्यामुळे तपासात बाधा येण्याची शक्यता आहे. तसेच आरोपी मुक्त झाल्यास गुन्हातील साक्षीदारांना धमकावून, प्रलोभने दाखवून तपासात अडथळा आणू शकतात. घटनेचा इत्यंभूत लेखाजोखा मिळण्यासाठी आणि आरोपींचा महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचारासंबंधातील अन्य गुन्ह्यांत सहभाग आहे का, याचे अन्वेषण करणे महत्त्वाचे आहे. या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध यापूर्वी मालवण पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. २२/२०२१ भादवि १४३, १४७, १४८, १४९, ४१५, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच गुन्हातील पिडीत, साक्षीदार तसेच आरोपी हे मालवण शहर परिसरात राहणारे असल्याने आरोपींकडून पिडीत, साक्षीदार यांच्या जीवीतास धोका असण्याची आणि त्याआधारे गंभीर गुन्ह्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. आरोपींच्या गैरकृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ते जामिनावर मुक्त झाल्यास फरार होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारची कारणे अॕड. देसाई यांनी न्यायालयाकडे सादर केली. त्यानुषंगाने आरोपींचा अटकपूर्व जामिन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..