जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान..

जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान..

मालवण /-


मालवण मेढा येथे जाळ्यात अडकलेल्या ९ फुटी अजगराला सर्पमित्र नागेश परब व भूषण परब यांनी पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देत जीवदान दिले. मालवण मेढा जय गणेश मंदिर येथील मारुती भाबल व तुकाराम भाबल यांच्या घराशेजारी अजगर अडकलेला असल्याचे निदर्शनास आले. भाबल यांनी सर्पमित्र नागेश परब व भूषण परब यांच्याशी संपर्क साधला. परब बंधूनी अजगराला जाळ्यातून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले.

अभिप्राय द्या..