You are currently viewing वेंगुर्ले भाजपा च्या वतीने डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिन सप्ताहा निमित्त वृक्षारोपण व वृक्षवाटप..

वेंगुर्ले भाजपा च्या वतीने डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिन सप्ताहा निमित्त वृक्षारोपण व वृक्षवाटप..

वेंगुर्ले /-

वेंगुर्ला – जनसंघाचे संस्थापक व भाजपाचे प्रेरणास्त्रोत डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन २३ जुन आणि जन्मदिन ६ जुलै या कालावधीत ‘स्मृतिदिन सप्ताहा’ चे आयोजन वेंगुर्ले भाजपा च्या वतीने करण्यात आले आहे.आज ३ जुलै रोजी परबवाडा ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण व वृक्षवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वृक्षारोपणाबाबत जनजागृती करुन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केले.यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, परबवाडा उपसरपंच संतोष सावंत, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व माजी उपसरपंच संजय मळगांवकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी परबवाडा तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुनिल हरी परब, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाट, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , डाॅ.बाळु गवंडे, कांता देसाई, वायरमन साटेलकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी जगदीश परब व सिध्देश कापडोसकर तसेच आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..