You are currently viewing विरण येथे कोरोना लसीकरण सुरू!

विरण येथे कोरोना लसीकरण सुरू!

मसुरे /-

आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक असलेले मसदे- चुनवरे गावचे सुपुत्र राकेश परब यांच्या प्रयत्नांमुळे मसदे- चुनवरे ग्रा.पं.कार्यालयात कोव्हीड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.मंगळवारी ११० जणांना लसीकरण करण्यात आले. सरपंच श्रेया परब, उपसरपंच कलाधर कुशे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामसेविका सौ. मनस्वी कुणकवळेकर- देवरुखकर,शमिका वाडकर, ललित माडये, आरोग्य सेविका एस एम नार्वेकर, कदुळकर आदी उपस्थित होते.गावातील ग्रामस्थांना कोव्हीड लसीकरणासाठी गावाबाहेर आरोग्य केंद्रात जावे लागत असे. गावातच लसीकरणाची सोय उपलब्ध केल्याबद्दल मसदे- चुनवरे वासियांतून समाधान व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..