You are currently viewing कुडाळ बसस्थानक 25 वर्षे राणेंना जमले नाही ते आ.वैभव नाईक यांनी 5 वर्षात बांधले.;शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट

कुडाळ बसस्थानक 25 वर्षे राणेंना जमले नाही ते आ.वैभव नाईक यांनी 5 वर्षात बांधले.;शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट

कुडाळ /-

कुडाळ बसस्थानकावरील घड्याळ लावले त्याठिकाणचे पत्रे उडाले हे भांडवल राणे समर्थकांनी करण्यापेक्षा तुमचे नेते नारायण राणे हे पालकमंत्री असताना जे त्यांना जमले नाही ते आमदार वैभव नाईक यांनी आपल्या पाच वर्षांत केले असा पलटवार कुडाळ शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट यांनी केला आहे.या वेळी बोलताना श्री शिरसाट म्हणाले कुडाळ बसस्थानक आम्ही लहान असल्या पासुन पहात आहोत जसे आहे तसेच होते अनेक वेळा स्लॅबचे तुकडे कपाळावर पडुन अनेक वेळा प्रवासी जखमी झाले अशावेळी गेल्या पंचवीस वर्षात अनेक सत्तास्थाने नारायण राणे यांच्या कडे होती परंतु हे कुडाळ बसस्थानक बांधावे ही बुध्दी कधी झाली नाही मात्र आमदार वैभव नाईक यांनी ही कुडाळ शहरामधे असलेली आणि ग्रामीण भागातील जनतेला अपेक्षित असे आपल्या पाच वर्षांच्या आत बांधुन पुर्ण केले यासाठी अभिनंदन करायचे सोडाच कधी चिखलातले फोटो दाखवायचे तर कधी घड्याळावरील पत्रे उघडलेले फोटो प्रसारीत करायचे हा एककलमी कार्यक्रम विरोधक करत आहेत असे सांगून श्री शिरसाट म्हणाले एवढा मोठा निधी आणताना काही अडचणी निर्माण होतात तर काही कामे संथगतीने होतात हा सगळाच दोष आमदार वैभव नाईक यांना देऊन आपला अपयश ढाकुन ठेवुन जनतेचे लक्ष विचलित करणे हा एकमेव धंदा राणे समर्थक करीत आहेत.तसेच गेली कित्येक वर्षे आपले नेते नारायण राणे पालकमंत्री होते तर या कुडाळ बसस्थानक बांधण्यासाठी निधी का दीला नाही अशी कितीतरी उदाहरणे असतील कि कुडाळ शहराकडे माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी दुर्लक्ष केलेली विकासकामे आमदार वैभव नाईक यांनी पुर्ण केली याचा आम्हाला अभिमान आहे त्या मुळे पुन्हा पुन्हा स्टंटबाजी करणा-या राणे समर्थकांनी लक्षात ठेवा तुम्हाला जनता कंटाळली म्हणून कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांना कुडाळ मालवण मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी दुस-यावेळी दीली आहे आणखीन काय उदाहरणे तुम्हाला द्यायची असा पलटवार श्री शिरसाट यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा