अकरावी व बारावीतील १५४२ विद्यार्थ्यांनी घेतला शाहू महाराज राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग..

सावंतवाडी /-


लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनविषयक आधारीत राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.संजय सुतार, तंत्र विभागाचे व राज्य संशोधन प्रमुख आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमुख प्रा.अविनाश यमगर, स्पर्धा समन्वयक प्रा.शाम दुसाने, स्पर्धा प्रसिद्धी प्रमुख प्रा.राम बागुल व स्पर्धा तंत्रस्नेही प्रमुख प्रा.गिरीष लोंढे यांच्या महत परीश्रमातुन राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त परीषदेने “राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धा ” मराठी व इंग्रजी या दोन भाषेत आयोजित केले होते. अभाषी पद्धतीने आयोजित या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातील नउ विभागातुन अकरावी व बारावीच्या एक हजार पाचशे बेचाळीस (१५४२) विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवून एक वेगळाच विक्रम केला. त्यात सर्वात जास्त नाशिक विभागातुन ३३१ , अमरावती विभागात ३०२, मुंबई विभागातुन २५३, पुणे विभाग १९७, कोल्हापूर विभाग १७४, लातुर विभाग १६२, औरंगाबाद विभाग ५४, नागपूर विभागात ५० तर अति दुर्गम अश्या कोकण विभागातुन १९ अशी राज्यातून सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत एक हजार पाचशे बेचाळीस अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा यशस्वीतेसाठी राज्य उपाध्यक्ष प्रा.सुरेश नारायणे, प्रा.शरद जोगी, कार्याध्यक्ष संजय सुतार, सचिव डॉ.पितांबर उरकुडे, कोषाध्यक्ष स्मिता जयकर, सहसचिव सुनिल राठोड व राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व विभागीय अध्यक्ष व सचिव तसेच कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य त्याच बरोबर छत्तीस जिल्ह्यातील अध्यक्ष, सचिव कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. राज्यशास्त्र परिषदेद्वारे वर्षभर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विषयांचे ऑनलाईन अभ्यास व्हीडीओ, ऑडिओ, गुगलमीट द्वारे प्रत्यक्ष मार्गदर्शन तसेच बेविनारचे वेळोवेळी आयोजन केले जाते. परिषदेने मागील वर्षी संविधान दिन, मतदार जागृती दिन, विविध विषयांवरील प्रश्नसंच विद्यार्थ्यांना लाॅकडाऊनच्या काळात उपलब्ध करुन दिल्या. राज्यशास्त्र परिषद राज्यात विद्यार्थी व शिक्षक यांच्या हिताचे विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. भविष्यातही अनेक विद्यार्थी व शिक्षक यांच्या हिताचे कार्यक्रम करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुमित पवार सर यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले. परिषदेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी या उपक्रमात मनापासून सहभागी होवून स्पर्धा यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले, त्या सर्वांचे अभिनंदन अध्यक्ष प्रा.सुमित पवार यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..