विश्व हिंदु परिषद प्रखंड वेंगुर्लेच्यावतीने मठ आरोग्य उपकेंद्रास पीपीई कीट भेट…

विश्व हिंदु परिषद प्रखंड वेंगुर्लेच्यावतीने मठ आरोग्य उपकेंद्रास पीपीई कीट भेट…

वेंगुर्ला /-

विश्व हिंदु परिषदेने वेंगुर्ले तालुक्यातील जवळ जवळ सर्वच आरोग्य उपकेंद्राना पीपीई कीट दिली . आरोग्य सेवकांना तसेच आशा स्वयंसेवीकांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मुबलक प्रमाणात पीपीई कीट मीळत नसल्याने त्यांना सेवा बजावताना अडचणींचा सामना करावा लागतो , ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक भावनेतून विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने आरोग्य उपकेंद्राना पीपीई कीट देण्यात आली . मठ येथील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी राखी कुडतरकर व मोहन धुरी यांच्या कडे ही पीपीई कीट देण्यात आली . यावेळी ग्रामसेवक केळुसकर , कोतवाल सुरेश मठकर , ग्रामपंचायत लीपीक प्रकाश बोवलेकर उपस्थित होते . यावेळी भाजपा ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ व अजीत नाईक , रविंद्र खानोलकर , युवा मोर्चा ता. चिटनीस समीर नाईक , युवा कार्यकर्ते प्रशांत बोवलेकर , बुथप्रमुख अनिल तेंडोलकर व जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई उपस्थित होते .

अभिप्राय द्या..