पाल पुनवर्सन मध्ये नेत्र तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद !

पाल पुनवर्सन मध्ये नेत्र तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद !

दोडामार्ग /-


ग्रामपंचायत कुडासे खुर्द ( पाल पुनवर्सन) व लाईफ टाईम मेडीकल कॉलेज,पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने* नेत्र तपासणी शिबिर नुकतेच पाल पुनवर्सन कुडासे खुर्द ग्रामपंचयात कार्यलयात संपन्न झाले
यामध्ये अनेक वयोवृद्ध जेष्ठ नागरिक यांनी आपले डोळे तपासून घेतले काहींना मोतीबिंदू त्रास असल्याचे तज्ञ डॉक्टर यांनी तपासणी करून सांगितले त्याना लवकरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे यासाठी कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे
प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले यावेळी कुडासे खुर्द सरपंचा सौ. संगिता देसाई डॉ.हरीचंद्र परब डॉ. विकास लुडबे डॉ. शुशांत नाईक तसेच सदस्य संदेश देसाई सदस्या सौ.सानवी दळवी सदस्या सौ.मयुरी पालव पोलीस पाटील दाजी देसाई जेष्ठ ग्रामस्थ मनोहर सावंत ,बोयडो हरिजन,मानाजी राणे आदी उपस्थित होते
या कार्यक्रमात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने उर्वरित पेशंट यांना सरपंच यांच् या निवासस्थानी सेवा देण्यात आली यामध्ये एकूण 90 ग्रामस्थानी लाभ घेतला या उपक्रमाबद्दल ग्रामस्थनी सरपंच व सदस्य यांचे कौतुक केले

अभिप्राय द्या..