वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा गाव कार्यक्षेत्रात रविवारी आरटीपीसीआर टेस्ट तपासणी मोहिम राबविण्यात आली.यावेळी १५४ व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट व ३७ व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली.यामधील रॅपिड टेस्ट मध्ये सर्व अहवाल निगेटिव्ह आले.गाव कोरोना मुक्तीसाठी तहसिलदार यांच्या आदेशान्वये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिरोडा ग्रा.पं. सरपंच मनोज उगवेकर व ग्राम कृती समिती यांच्या नियोजनानुसार ग्रामस्थांची कोरोना टेस्ट करण्यात आली.यावेळी गांधीनगर,राऊतवाडा व बागायत आदी भागात टेस्ट मोहिम राबविण्यात आली.
यावेळी सरपंच मनोज उगवेकर, ग्रा.पं. सदस्य कौशिक परब,राहुल गावडे,मयुरी राऊळ, वेदिका शेट्ये व अन्य सदस्य तसेच प्रा.आ.केंद्र रेडी वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा नवार,आरोग्य सहाय्यक संजय करंगुटकर, आरोग्यसेवक विकास आजगावकर,आरोग्यसेविका संध्या रेडकर,के.के.नाईक,आरोग्य कर्मचारी ज्योती कदम,सत्यवान मठकर,मुरलीधर गवंडे, व्ही.व्ही.धुरी, अंकिता तोरसकर तसेच होमगार्ड आरोसकर,तोरसकर,कदम व
पोलिस प्रशासन शिरोडा
यांच्या सहकार्याने
शिरोडा कार्यक्षेत्रात नागरिकांची तपासणी करण्यात आली.
गाव कोरोना मुक्तीसाठी उर्वरित भागातही ग्रामस्थांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे,असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page